Reg.No - A5024 (Parbhani)
श्री हिंगुलांबिका देवी शारदीय नवरात्र महोत्सव
संपूर्ण भारतात श्री देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात अश्विन महिण्याच्या सुरुवातीला म्हणजेच शुध्द प्रतिपदेपासून देविच्या शारदीय नवरात्री महोत्सवास सुरुवात होत असते.
II सर्व मंगल मांगल्ये शिवे सेवार्थ साधिके
शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते II
प्रतिपदेपासून ते दशमी पर्यंत म्हणजेच विजयादशमी पर्यंत हा महोत्सव सर्वत्र अतिशय आनंदात साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे. दहा दिवसात सर्वत्र देविचे मंदिरे 24 तास उघडे राहत असून देवी स्वत: 10 दिवस जागृत अवस्थेत राहून सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. त्यामुळे या कालावधीत प्रत्येकजन आप आपल्या परिने देविची उपासना करीत असतात. या मध्ये 9 दिवस उपवास करुन फक्त निराळाचे पदार्थ दोन वेळी आहार घेऊन नवमीला उपवासाची सांगता करण्यात येते.
परभणी येथिल श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात सुध्दा 1 महिना अगोदर पासून तयारी सुरु होते. नवरात्रीचे प्रथम दिनी श्री देविस महाअभिषेक करण्यात येऊन घटस्थापना करण्यात येते. दुपारी ब्रम्हवृंदा मार्फत दररोज श्री देविचे सप्तशती पाठाचे आवर्तन करण्यात येते. दुपारी 4.00 वाजता भाविक भक्ता मार्फत 9 दिवस दररोज नवचंडी यज्ञ सोहळा केला जातो. या मध्ये भाविक स्वत:हून नवचंडी करीता नांवे देऊन होम-हवन कार्यक्रमात सहभाग नोंदवितात. दररोज किमान 4 यजमान यज्ञाकरिता हजर राहतात. या करीता नाममात्र शुल्क आकारण्यात येऊन उर्वरित साहित्याची व्यवस्था मंदिर समितीतर्फे करण्यात येते. उदा. पुजेचे साहित्यासह हवना करीता गाईचे तुप, यज्ञाकरीता समिधा, गाईच्या शेणाच्या गोव-या, हळद-कुंकू, गुलाल, अक्षदा, मद, विडयाचे पाने वगैरे साहित्य तर यजमान यांना फुलांचे हार, प्रसाद, हवनाकरीता पायस इ. सामान आणावे लागते.
नऊ दिवस नवचंडी यज्ञ झाल्यानंतर नवमिला यज्ञाची सांगता पूर्णाहूती देऊन करण्यात येते. यावेळी सर्व यजमान प्रतिपदे पासन ते आष्टमीपर्यंत उपस्थि राहून पूर्णाहूती कार्यक्रमात सहभागी होतात. या सर्व प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंतचे नवचंडी यज्ञाचे कार्यक्रम वे.श.सं.श्रीमान नरहरी गुरु जोशी यांचे मार्गदर्शन व पौराहित्याखाली साजरे केले जातात.