Reg.No - A5024 (Parbhani)
श्री हिंगुलांबिका देवी मुर्ती बाबत माहिती
श्री होन्नगुंटी या पवित्रा क्षेत्रि गुलबर्गा पासून 25-30 किमी अंतरावर भिमा कागिनी नदीच्या संगमावर एक छोटेशे परंतु अतिशय छान असे हेमाडपंती पुरातन श्री चंद्रलंबा देविचे मंदिर (म्हणजेच श्री हिंगुलांबिका देवी मंदिर) अस्तीत्वात आहे. येथे एका मुनिने उत्तरेतून देविची अतिशय खडतर तपश्यर्चा करुन देविस प्रसन्न करुन होन्नगुंटी या ठिकाणी आणले आहे. या ठिकाणी देविची एक स्वयंभु मुर्ती आहे. याच देविचे फोटो घेऊन पंढरपूर येथिल मुर्तीकार श्री परदेशी यांच्या कडून ही भव्य व अतिशय देखनी मुर्ती काळया संगमरवरी पाशानात बनण्यिात आलेली आहे.
मुर्तीची प्रतिष्ठपणा दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2008 मध्ये अतिशय भक्तीमय वातावरणात ह.भ.प. श्री बाळूगुरु असोलेकर गुरु यांच्या पावन हस्ते विधिवत पुजा करण्यात येऊन मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. मुर्ती अतिशय कोरीव असून देखनी व जाज्वल्य आहे. याचा प्रत्यय अनेक भाविक-भक्तस मागील 12 ते 13 वर्षापासून येत आहे किंवा आलेला आहे.