top of page

एचएम देवी मंदिराबद्दल

logo.png

परभणी शहारातील भावसार समाज हा एक कुटुंब सोडले तर सर्व नौकरी/ व्यवसाय/ शिक्षण या निमित्ताने बाहेर गांवाहून आलेला व कालांतराने येथेच स्थायिक झालेला समाज होय. जवळपास 130 पेक्षा अधिक कुटूंबे येथे कायम वास्तव्यास आहेत व श्री.हिंगुंलांबीकेच्या कृपेने आपल्या नैकरी/ व्यवसायात चांगल्या प्रकारे प्रगती करून स्थिरावलेले आहेत. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून आलेल्या समाज बांधवाना एकत्रित करण्याचे कार्य तत्कालीन अध्यक्ष स्व़.श्री.सरवदेसाहेब,स्व़.श्री.सुत्रावेसाहेब,स्व़.श्री.प्रल्हादरावजी अंबेकर साहेब त्यानंतर स.भु. डॉ. मारोतराव लांडे साहेब जे नंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले या मान्यवरांनी सातत्याने केलेले आहे.

     सन 1982 मध्ये  सर्व भावसारांची एकत्र वसाहत असावी या उद्देशाने तत्कालीन अध्यक्ष कै. प्रल्हादरावजी अंबेकर व सभु डॉ. मारोतराव लांडे यांनी सर्वसमाज बांधवाना एकत्र करून वसमत रोडवरील कारेगांव परिसरात जमिन विकत घेवून नियोजित भावसार गृह निर्माण संस्था स्थापन करून सर्व शासकीय सोपस्कारानंतर या मध्ये सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांना त्यांचे प्लॉटचे हस्तांतरण केले.

               सन 2005-2006 मध्ये या ठिकाणी भावसार समाजाची कुलदेवता श्री हिंगुलांबीका देविचे मंदिर उभारण्याची कल्पना सर्वानुमते राबवण्यात आली. त्या करीता सर्व समाज बांधवानी व दानशूर व्यक्तींनी यथाशक्ती सढळ हाताने देणगी दिली व समाजाकडे उपलब्ध कांही पैसा व देणगी यातून रु.3.50 लक्ष किंमतीचे मुख्य़ मंदिराचे (गाभाऱ्याचे) बांधकाम करण्यात आले. त्यावेळेस श्री. मुरलीधर चांडगे समाजाचे अध्यक्ष पद भुषवत होते. श्री. प्रल्हादराव कठारे व श्री. मुरलीधर चांडगे यांच्या मदतीने जिल्हा परिषद परभणी येथिल पाणी पुरवठा विभागा मधून एक

बोअर घेण्यात आला. त्यावर इलेक्ट्रिक मोटार हि महिला बचतगटा मार्फत त्यांच्या बचतीतून बसविण्यात आली.

     गाभा-याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गाभा-यात श्री हिंगुलांबीका देवीची मुर्ती काळया संगमरवरी पाषानात दि.16-18 फेब्रुवारी 2008 रोजी विधीवत मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा करण्यांत आली. गाभाऱ्यातील टाईल्स बसविल्या, गाभाऱ्या समोरील ओटयाचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी डॉ. गोपाळ जवादे, श्री. वसंतराव लांडे, डॉ. शेळके साहेब, महिला बचत गट, श्री. प्रल्हादराव कठारे, श्री. एस. एम. गर्जे यांच्या देणगीतून काम पूर्ण केले. 2013 मध्ये देवी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. श्री. वसंतराव लांडे हे अध्यक्ष झाले त्यानंतर मा. डॉ. गोपाळराव जवादे अध्यक्ष असतांना त्यांचे विशेष प्रयत्नातून तत्कालीन मा. आमदार श्री. सुरेशदादा देशमुख साहेबांनी सभागृहासाठी प्रथमच रु. 5.00 लक्ष स्थानिक विकास निधी दिला व त्यामधून मुख्य़ मंदिरासमोर 30X30 फुट आकाराचे सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यांत आले. गट, खिडक्या तसेच रंगरंगोटी करीता शासकीय निधी कमी पडत असल्याने समाजातील अनेक व्यक्तीनी देणगी स्वरुपात जवळपास 40,000/- रुपयाचा निधी जमा करून हे काम पूर्णत्वास नेले. मंदिराच्या मुख्य़ गाभाऱ्यास चौकटीसह दरवजा श्री मुरलीधर चांडगे यांनी अर्पन केला तर श्री. हिंगलाज मातेच्या मुर्तीच्या मागील मंत्र श्री ललित भावसार तर मुर्तीच्या बाजुस असलेली कमान श्री सुर्यकांतरावजी ढगे यांनी अर्पन केलेली आहे. श्री. उल्हास खंबायतकर परिवारातर्फे मातेस चांदीचा मुकूट अर्पन करण्यात आला तर देविचे अनेक दागीने भावसार महिला मंडळातर्फे अर्पन करण्यात आलेले आहेत.

     त्यानंतर मा. आमदार श्री. बाबाजानी दुर्राणी, विधान परिषद सदस्य़ परभणी /हिंगोली यांना अध्यक्ष व समाज बांधवानी विनंती केल्यावरून त्यांनी त्यांचे स्थानिक विकास निधीतुन रु.10.00 लक्ष एवढा निधी मंजूर केला. या निधीअंतर्गत पहिल्या सभागृहास लागून 50X50 फुटाचे नविन सभागृहाचे बांधकाम करण्यांत आले. या सभागृहाच्या बांधकामा सोबतच छतावर जाण्यासाठी पायऱ्या, एक रुम 15X20, फेरीमार्गाने बांधकाम, खालील बाजूस 2 संडास, बाथरुम बांधण्यात आले. या सर्व कामावर जवळपास 15.87 लक्ष खर्च झाला. शासकीय निधी केवळ रु.8.50 लक्ष मिळाला जो कंत्राटदारामार्फत करण्यांत आला उर्वरित रु.7.37 लक्ष निधी हा देणगी तथा इतर माध्यमातून उभारून काम पूर्ण करण्यात आले. सभागृहाचे भूमिपुजन व सभागृहाचे यथोचित उद्घाटन मा. आ. श्री. बाबाजानी दुर्राणी तथा मा. ना. श्री. प्रकाशदादा सोळंके, पालकमंत्री, परभणी यांच्या हस्ते करण्यात आले.

     परभणी वसमत या मुख्य रस्त्यापासून श्री हिंगलाजमाता मंदिराकडे जाण्याकरीता रस्ता नसल्यामुळे भाविक भक्ताना व सर्व समाज बांधवाना जाण्या-येण्याचा त्रास होत असल्याने मुख्य़ रस्त्यापासून मंदिरापर्यंतचा शिव रस्त्याचे बांधकाम करण्याकरीता कार्यालयाकडून माहिती घेऊन सर्व नकाशे जमा - एकत्रा करून रस्त्याची अलाईनमेंट निश्चित करण्यात आली. या मध्ये कारेगांव गांवाकडे जाणारा शिव रस्ता हा दत्त्‍धाम परिसरातून जात असतांना दत्त्‍धाम विश्वस्थाच्या विनंतीस मान देऊन रस्ता मुख्य़ रस्त्यापासून 120 मिटर रस्ता काटकोनात घ्यावा लागला. या रस्त्याच्या कामासाठी आतोनात परिश्रम घ्यावे लागले. 2014 मध्ये नवरात्र महोत्स़व, मंदिराची मुख्य़ रस्त्यावरील कमान व रस्त्याच्या कामाकरीता श्री. हरिष मल्होत्रा  व आपले समाज बांधव श्री. किरणजी धोत्रे साहेब चिफ अकाऊंट ऑफिसर जि.प. परभणी व समाज बांधव यांच्या सहकार्यातून जि. प. सेस फंडातून रु. 15.00 लक्ष निधी एकूण 800 मीटर खडीच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यांत आले. सभु श्रीराम गर्जे व अध्यक्ष श्री. राजेश्वरजी पेंडकर तथा समाज बांधव यांनी मा. आ.श्री.बाबाजानी दुर्रानी यांना विनंती केल्यावरून त्यांनी रुपये 15.00 लक्ष निधी आपल्या स्था.वि. निधीमधून मंजूर केला व त्यातून 400 मीटर रस्तयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

     यानंतर मंदिरावरील शिखराचे बांधकाम हाती घेण्यात आले. या कामामध्ये श्री. सुधिर बेदरकर व स.भु.श्रीराम गर्जे यांनी कामावर व खर्चावर नियंत्रण करून काम पूर्ण केले. यासाठी समाज बांधवाकडून तसेच इतर समाजातील मित्रमंडळी व नातेवाईकाकडून सहकार्य लाभले. सन 2015 मध्ये मंदिर परिसरातील इतर कामे व महाराष्ट़ कार्यकारणीची सभा घेण्यांत आली. यावेळी मंदिर सभागृहाच्या बाजूस 20 बाय 90 फुटाचे शेड उभारण्यात आले. या सभेकरीता लाऊडस्पिकर, खुच्या, पोडेम, टेबल, स्प्रिंकलर, वॉटर कुलर, पेव्ह़र ब्लॉक, सिमेंट कॉक्रीटींग, लाईटींग, सर्व कार्यकारीमंडळास नाष्टा, जेवण, सत्कार खर्च इत्यादी कामे कामे करण्यात आली. याच कालवधीमध्ये श्री. संजय तांदळे व भवसार समाज परभणीच्या वतीने कळसारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

     आदरणीय श्री. हरिष मल्होत्रा साहेबांना वैयक्तीक विनंती केल्यावरुन मंदिरास कमान बांधकामा करीता रु.1,11,000/-,वॉटर फिल्टर करीता 35,000/- सभागृहाच्या बाजूस 20 बाय 90 च्या हॉल करीता फर्शी लावण्या करीता 1,00,000/- हया मागील वर्षी 2019 मध्ये सभागृहा समोरील शेड करीता 1,00,000/- असे एकूण 3,46,000/- व अन्न्‍दानाकरीता 11,000/- असे एकूण 3,57,000.00 ची सढळ हस्ते देणगी आणुन कामे करून घेतली आहेत. श्री. मल्होत्राजीने भावसार व्हिजन इंडिया फाऊडेशनला रु. 1,00,000/- व तुळजापूर धर्मशाळेकरीता रु.1,25,000/- देणगी दिलेली आहे. भावसार समाजास एकूण रु. 5,82,000/- ची मोठी देणगी आहे. भावसार समाज,परभणी तथा विश्वस्त मंडळ परभणी यांच्या वतीने आदरणीय श्री. मल्होत्रा साहेबांचे शतश: आभार.

     यानंतर 2016 मध्ये आदरणीय आमदार श्रीयुक्त़ डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील साहेब यांच्या स्था. वि. निधी अंतर्गत सीसी रस्ता बांधकामा करीता रु. 5.00 लक्षाचा निधी प्राप्त़ झाला. सदरील निधी हा आपल्या समाजाच्या महिला अध्यक्षा सौ. निर्मला भावसार व समाज बांधवाच्या प्रयत्नातून मिळाला या मध्ये जवळपास 120 मीटरचे सीसी रस्त्याचे काम पूर्ण करण्यांत आले. त्यानंतर 2017-2018 मध्ये मा. श्री. संजय गाडगे शहर प्रमुख शिवसेना यांच्या सहकार्याने रु.9.00 लक्षाचा निधी सीसी रस्ता बांधकामा करीता आदरणीय आमदार श्रीयुक्त़ डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील साहेब यांच्या स्थानिक विकास निधी मधून प्राप्त होऊन त्यामधुन 180 मीटर सीसी रस्त्याचे काम करण्यात आले. मंदिराच्या अर्ध्या सभागृहापासून ते फेरी मारुन श्री. लांडे यांचे प्लॉटपर्यंत रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले. तसेच याच दरम्यान श्री. किरणजी धोत्रे  साहेब चिफ अकाऊंट ऑफिसर जि. प. परभणी यांच्या सहकार्यातून जि. प. सेस फंड मधून रु. 3.00 लक्ष सी.सी. ड्रेन करीता मंजूर होऊन मंदिराच्या डाव्या, उजव्या व मागील बाजूस सी.सी. ड्रेनचे काम श्री. लोंढे कंत्राटदारा मार्फत पूर्ण करण्यांत आले.

     अश्या प्रकारे आतापर्यंत स्था.वि.निधी अंतर्गत व जि.प. सेस फंड अंतर्गत विविध पक्षाच्या आमदार महोदयाकडून एकूण 58.00 लक्ष रुपये व श्री. मल्होत्राजीकडून आलेल्या अनमोल निधी प्राप्त्‍ करून मंदिराची तसेच रस्त्याची  उभारणी करण्यांत आलेली आहे. तसेच 2019 मध्ये दोन्ही आमदार महोदयांनी आपल्या समाजास आश्वासन दिले आहे की, अजून किती फंड लागतो तो ते देण्यास तयार आहे. स्था. निधी 58.00 लक्ष व समाज बांधवाचा निधी जवळपास रु. 95.00 लक्षाची कामे करण्यांत आली. जे की, महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात एकमेव उदाहरण होय.

     हे होत असतांनाच अध्यक्ष श्री. राजेश्व़र प्र. पेंडकर व श्रीरामजी गर्जे व त्यांचे सहकारी यांनी मंदिराचे विस्तार प्रगतीसाठी आहोरात्र विचार करून व समाज बांधव व समाजा बाहेरील देवीभक्तांचे सहकार्याने कामे चालू ठेवली. यामध्ये समाज बांधव व तत्कालीन मुख्य़ अभियंता श्री. चंद्रशेखर तुंगे यांनी भरीव मदत केलेली आहे. याशिवाय वार्षिक कार्यक्रम जसे श्री. हिंगुलांबीका नवरात्र महोत्स़व, अखंड नंदादिप, होम हवन, देविचा प्रगट दिन, दिपावली पाडवा व नववर्ष पाडवा दिपावली दिपोस्व़व, संक्राती निमित्ताने हाळदी-कुंकू, जेष्ठ़ समाज बांधवाचा तसेच सेवा निवृत्ताचा सत्कार कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम शहर पातळीवर तथा जिल्हा पातळीवर घेण्यांत आले. त्याच बरोबर परभणी तथा जिल्हायातील गरजु 15-20 मुलां-मुलींना मागील 4 वर्षात जवळपास 2.50 ते 3.00 लक्ष रुपयाची शैक्षणिक मदत भावसार व्हिजन इंडिया फाऊंडेशन मार्फत मिळवून दिली त्यातून जवळपास 4 मुलां-मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. या पुढेही प्रत्येक वर्षी जवळपास 50 हजाराची शैक्षणिक मदत देण्यात येईल. सर्वात मोठा व भव्य असा वधु-वर परिचय  मेळावा परभणी जिल्हा भावसार समाज व भावसार व्हिजन इंडिया मार्फत 20 मे 2018 मध्ये यशस्वी रित्या घेण्यांत आला. या मेळाव्यास महाराष्ट्रातून जवळपास 4000 पेक्षा जासत समाज बांधव हजर होते. जवळपास 750 मुलांमुलीची माहिती संकलीत करून आकर्षक भावस्प़र्ष  पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या मेळाव्यात  300-350 मुलां-मुलीनी परिाचय दिला तसेच या माध्यमातून जवळपास आमच्या माहिती प्रमाणे 90-100 लग्ने जुळलेली आहेत. सर्व महाराष्ट्रात या मेळाव्याची प्रशंसा झाली.

     मंदिराची उपरोक्त़ प्रगती व परभणी भावसार समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्रा बाहेरही होणारे चांगले नांव व समाजाचा दबदबा निर्माण झाला. या ठिकाणी मागील 2-3 वर्षात आपले सामाजिक कार्यक्रम सोडून लग्न्, मुंज, साखरपुडा असे विविध जवळपास 225-300 छोटी मोठे कार्यक्रम आपल्या मंदिर परिसरात पार पडलेली आहेत.

     श्री हिंगुलांबीका देवी मंदिर विश्वस्थ् संस्था, परभणी साधरणत: सन जानेवारी, 2017 मध्ये नोंदणी झालेली आहे. त्यानंतर इतर कामे करीत असतानांच ऑक्टोबर 2021 मध्ये संस्थेस 12-अ व 80-जी म्हणून नोंदणी यशस्वी झालेली आहे. तसेच मंदिराची नोंदणी ही महाराष्ट्र शासनाच्या तिर्थक्षेत्रविकास म्हणून जानेवारी 2022 मध्ये मा. जिल्हाधिकारी परभणी व जिल्हा परिषद परभणी परभणी मार्फत घोषणा झालेली आहे.

 

     तरी समस्त भावसार बंधु भगिनीना विनंती करण्यात येते की, आपन एकदा तरी परभणी येथिल श्री हिंगुलांबीका देवी मंदिर व तेथिल रम्य परिसरास सहकुटुंब भेट द्यावी व मातेचे शुभर्शिवाद घ्यावे. तसेच पुढील प्रस्तावित विकास कामासाठी सढळ हस्ते देणगी देवून 80 – जी अंतर्गत कर परतावा मिळवावा हि नम्र विनंती.

 

जय ‍हिंगलाज जय भावसार

     

संकलन

सभु श्रीराम मा. गर्जे

परभणी

bottom of page