Reg.No - A5024 (Parbhani)
श्री हिंगुलांबिका देवी प्रगट दिन सोहळा
संपूर्ण जगामध्ये तथा संपूर्ण भारतभरात श्री हिंगुलांबिका मातेचा प्रगटदिन फाल्गुण पोर्णिमेनंतर येणा-या त्रियोदशीस देवीचा प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात येतो. या तिथीला श्री हिंगुलांबिका देवी प्रगट झाल्याचे पुरावे देवी भागवत व ईतर पौराणिक साहित्यात माहिती उपलब्ध आहे.
परभणी शहरातील श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात देवीचा प्रगटदिन सर्व समाज बांधव व श्री देवी भक्त यांच्या सहभागाने अतिउत्साहात साजरा केला जातो. सकाळी श्रीदेविस अभिषेक करुन नविन वस्त्र देविस परिधान करुन मंदिरात सप्तशतीचे पाठ ब्रम्हवृंदामार्फत केल्या जाते. तसेच समाज बांधवाचे सहकार्याने मंदिरात श्री नवचंडी याग ब्रम्हवृंद व वे.शा.स. श्री नरहारी गुरु जोशी यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होऊन नंतर उपस्थित नागरीक, समाज बांधव, परिसरातील व परभणी श्हरातीलदेवी भक्ताकडून श्री नरहरी गुरु जोशी यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येतो. श्री हिंगुलांबिका देवीमातेची परिसरातून मुख्य रस्त्यापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यांत येते. पालखी मिरवणूक मंदिरात परत आल्यानंतर मोठया भक्तीभावाने महाआरती होते. महाआरती नंतर 1500 ते 2000 समाज बांधव व भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात.
परभणी भावसार समाजाने पुढाकार घेऊन कारेगांव परिसरात दत्तधामच्या मागील बाजूस स.नं.17/01 मध्ये समाजाचे एकत्रिकरण करण्या करीता एकूण 48 प्लॉटचा भखंड विकत घेऊन सभासदास भावसार समाज नियोजित गृह निर्माण संस्था निर्माण केली. त्यावेळी श्रीमान प्रभाकर रामभाऊ अंबेकर, कार्यकारी अभियंता, स.भु. श्री मारोतराव गंगाधर लांडे, प्राध्यापक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, श्री अरविंदराव महिंद्रकर, श्री दत्तोपंत मसारे यांनी या करीता बरेच कष्ट घेतले. सदरील ले-आऊट मधिल मोकळी जागा साधारणत: 8500 चौ.फूट वर तत्कालीन श्री चंद्रशेखर वसंतराव तुंगे, कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हिंगलाजमाता देवी मंदिराचे काम हाती घेण्यात आले. सर्वप्रथम रितसर बांधकाम परवानगी घेण्यांत आली. त्यानंतर समाजाजवळ असलेल्या जमा निधीमधून 16 x 16 गाभा-याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. श्री हिंगलाज मातेची मुर्ती कर्नाटक मधिल होनगुंटी या भिमा कागीनी नदीच्या तिरावर एक हकमाडपंती मंदिर वसलेले आहे. देविस एका मुनीने घोर तपश्चर्यने प्रसन्न करुन या ठिकाणी देविस आणलेले आहे. या देविस तेथे चंद्रलंबा हया नावाने ओळखले जाते परंतु मुळ श्री हिंगलाज माता होय. या ठिकाणी देवी स्वंयभु मुर्तीच्या स्वरुपात आहे. हि सर्व माहिती घेऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन श्री मुरलीधर चांडगे, श्रीराम मा. गर्जे, श्री गजानन खपले यांनी सहपरिवार जाऊन तिथे मुक्काम करुन श्री देवीचा अभिषेक करुन तेथिल ब्रम्हवृंदाना भोजन घालून श्री देवीचा फाटो घेऊन श्री क्षेत्र पंढरपूर येथे येऊन तेथिल मुर्तीकार श्री परदेशी यांची भेट घेऊन मातेचा फाटो देऊन तशीच मुर्ती तयार करण्यास सांगीतले व त्यांनी ही त्यास मान्यता देऊन साधारण 3 महिण्यात काळया मार्बल मध्ये सिंहारुड मुर्ती तयार करुन नोव्हेंबर 2007 मध्ये मुती्र तयार होऊन श्री गजानन खपले व श्रीराम गर्जे यांच्या करवी परभणी मुर्ती आणून व वसमत रोड येथिल श्री प्रभाकरराव बंडे यांचे निवासस्थानी मुर्ती ठेवण्यात आली.
ह.भ.प.श्री बाळूगुरु असोलेकर परभणी यांचे मार्गदर्शनाखाली तथा त्यांच्या पावनस्पर्शाने तसेच वेद पठणाने व संपूर्ण शास्त्रोक्त पध्दतीने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2008 रोजी श्री हिंगलाज मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली. तत्पूर्वी परभणी शहरातील सर्व भावसार समाज बांधव व परिसरातील तथा परभणी शहरातील सर्व भाविक भक्तांना रितसर निमंत्रण देण्यात आले. दिनांक 16/02/2008 रोजी सर्व प्रथम श्री बंडे यांचे घरापासून ते नियोजित मंदिरापर्यंत देविची बँड,लेझिम पथक, अश्व, व सर्व समाज बांधव व भाविक भक्त यांच्या सहभागाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर देविस अभिषेक, देविस पहिले दोन दिवस तांदूळाच्या राशीमध्ये ठेवून विधीवत स्थापना करण्यात आली. तिसरे दिवशी महाप्रसादाने सांगता झाली.