top of page

श्री हिंगुलांबीका देवी 51 शक्तीपिठाची आराधना

DSC09484.JPG

भगवान शंकराने सती पार्वतीने अग्नि प्रवेश केल्यानंतर तिचे कलेवर खांदयावर घेऊन त्रीखंडात जे तांडव केले. या तांडव नृत्यात भगवान शंकर हे अतिशय क्रोधायमान झाले होते आणि क्रोधायमान अवस्थेत सतिच्या देहाची छिन्ह़-विछिन्ह़ अवस्था झाली. यात सतिच्या शरीराचे अवयव इतरत्र विखुरले गेले. ज्या ज्या ठिकाणी सतिचे अवयव पडले त्या त्या ठिकाणी सतीचे शक्तीपीठ निर्माण झाले. जसे की, हिंगलाज, महिषासुरमर्दिनी, तारिणी, अपर्णा संदुरी, सुनंदा, पापहरा, विश्वमातृका, गंडकी, नारायणी, वाराही, अंबिका, महारामाया, महालक्ष्मी, अवंती, चंद्रभागा, सिध्देश्वरी, भ्रामरी, कमला, दाक्षायणी, भवानी, महादेवी, शिवा, गायत्री, सावित्री, मगलचंडी, बहुलक्ष्मी, बहुला, वक्रेश्वरी, त्रिपुरमलिनी, शिवानी, त्रिपुरा, नवदुर्गा, विजया, भैरवी, कोकेश्वर, वेदगर्मा, काली, मिनाक्षी, कामाख्या, शुभचंडी, चंडीका, जयंती, महामाया, अमरी, त्रिपुरा, योगाद्या, कालीका, भिमरुपा संवरी विमला, विध्यवासिनी इ. होय.

 

     देवीची जी 51 शक्तीपीठे आहेत त्यापैकी पश्चिम भागात बलुच (पाकिस्तान) येथे पहिले शक्तीपीठ आहे. हिंगुला येथे सतीच्या शरीराचा ब्रम्हरथ हा अवयव पडला. त्याठिकाणी शक्तीपिठ निर्माण होऊन देवीला श्री हिंगलाजमाता असे मानले जाते. पश्चीम भागात म्हणजे बलुचिस्थान (पाकीस्थान) मध्ये लाजबेला तहसिल लोहारी येथे श्री हिंगुलांबीका मातेचे शक्तीपीठ आहे. या देवीला हिंदु व मुस्लीम या दोन्ही समाजाचे लोक दर्शनासाठी जातात. या देवीला नानीमॉ म्हणून पाकीस्तानमध्ये ओळखले जाते. देवीच्या दर्शनाचा मार्ग अतिशय बिकट व दऱ्याखोऱ्यातून जाणारा आहे. या देवीच्या दर्शनासाठी भारतातील भक्तगणानी पाकीस्तान मध्ये प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेतले आहे.

 

दर्शनासाठी पाकीस्तानमध्ये सुरुवातीला चंदपुर महादेव या ठिकाणी जावे लागते. त्या ठिकाणी एक नदी आहे. त्या नदीमध्ये आईच्या दर्शनासाठी जाण्याकरीता परवानगी घ्यावी लागते. त्या परवानगीसाठी त्या नदीमध्ये श्रीफळ सोडावे लागते. हे श्रीफळ जर नदीत बुडाले तर भक्त़ दर्शन घेण्यास पात्र आहे अशी अख्यायिका आहे. चंदपुर महादेवानंतर गणेश स्थान आहे. या ठिकाणी महादेवाने गणपतीचे शिर कापले होते म्हणून या स्थानाला सरकटा गणेश म्हणून ओळखले जाते. आजही त्या ठिकाणी सरकटा गणेशाची मुर्ती दर्शनासाठी आहे. विश्वामध्ये हे एकमेव स्थान आहे. गणपतीची पुजा केल्यानंतर आशापुरी या गांवी जावे लागते. त्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तासाठी निवासस्थानाची व्यवस्था पाकीस्तान सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच ठिकाणी हनुमानाचे मंदिर आहे. हनुमानाची पुजा अर्चना केल्यानंतर श्री हिंगुलांबीका मातेच्या मंदिराकडे जाण्याचा पैदल मार्ग दिड ते दोन किलोमीटर पायी जाण्याचा आहे. त्यानंतर हिंगुलांबीका मातेचे मंदिर गुफामध्येस्थित आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी कुंड आहेत. त्या कुंडामध्ये तीन वेळा देवीचे नांव घेवून डुबकी घ्यावी व त्यानंतर गर्भ गुफा मधून सरपटत डाव्या बाजूने जावे लागते. त्यानंतर त्या ठिकाणी देवीचे स्थान आहे. या गुफेमधून भक्त़ जेंव्हा सही सलामत जातो तेंव्हा त्याचा दुसरा जन्म़ झाला असे म्हटंले जाते. त्यानंतर त्या ठिकाणी देवीला चुडा, चुणडी व सुका मेवा अथवा श्रीफळाचा प्रसाद तसेच चंदन लावुन पुजा व आरती केली जाते. हे सर्व झाल्यानंतर तो भक्त़ त्या देवीचा कापडीया (पुत्र) होतो. श्रीरामाने रावनाचा वध केल्यानंतर रामाच्या हातून ब्रम्हहत्या झाल्यामुळे रामाने या ठिकाणी येवुन देवीची पुजा अर्चा केली अशी आख्यायीका आहे.

     याच हिंगलोबीका देवीची प्राण प्रतिष्ठापना वसमत रोड दत्तधाम च्या पाठीमागे कुलस्वामीनी नगर दत्तधाम मंदिराच्या मागील बाजूस दिनांक 16/02/2008 रोजी करण्यात आलेली प्रत्येक चैत्र पाडवा व दिपावली पाडव्यास मंदिरात दिवे लावुन दिपोत्स़व साजरा केला जातो. प्रत्येक नवरात्र महोत्सवामध्ये दरारोज भाविकांच्या वतीने सकाळ-संध्याकाळ आरती केली जाते. सन 2010 नवरात्र महोत्स़वामध्ये श्री. समाधान महाराज यांचे मधुर संगीत देवी भागवत कार्यक्रम घेण्यात आला होता. विशेषत: नवरात्रामध्ये या परिसरामध्ये देवीचे मंदिर नसल्यामुळे या मंदिरात भाविकांची गर्दी वाढत आहे. तसेच ही देवी नवसाला पावते असा भाविकांना अनुभव आला आहे. त्यामुळेच भाविकाकडून विविध देणगी रुपाने सोन्या-चांदीचे अलंकार व इतर वस्तू तसेच बांधकामास मदत केली जात असल्यामुळे या मंदिराची उत्तरोत्त़्र प्रगतीकडे वाटचाल चालू आहे. नवरात्र महोत्स़व 2015 मध्ये श्री. मा. आ. अब्दुला खॉन दुरॉणी उर्फ बाबाजानी विधान परिषद सदस्य़ (हिंगोली, परभणी) यांनी रस्ता बांधकामासाठी स्थानिक विकास निधीतुन रु. 15.00 लक्ष मंजूर केले आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. या रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. 24 ऑक्टोबर 2015 रोज शुक्रवार स. 11.00 वा. कुलस्वामीनी नगर, दत्त धामच्या पाठीमागे, वसमत रोड येथे आयोजन केला होता व त्याच दिवशी दर वर्षी प्रमाणे महाप्रसाद सर्व भाविकांसाठी आयोजित करण्यांत येतो..

     यासाठी परभणी भावसार समाजाने विशेष पुढाकार घेऊन मंदिराची व परिसरात वृक्ष लागवड करून प्रगतीकडे वाटचाल केलेली आहे. या मध्ये सर्व देवी भक्तानी एकदा आवश्य़क श्री हिंगुलिबिका मातेचे दर्शन घ्यावे व सढळ हाताने बांधकामासाठी निधी देण्यात यावा असे अवाहन करण्यात येत आहे.

 

स.भु. श्रीराम मा. गर्जे

उपाध्यक्ष ,महाराष्ट़ राज्य़ भावसार समाज

कुलस्वामीनी नगर, दत्तधामच्या मागील

बाजूस वसमत रोड परभणी

bottom of page