top of page

श्री हिंगुलांबिका देवी मंदिर विश्वस्त मंडळ परभणी

संकेतस्थळ (Internet Website) उभारणी करण्याचे उद्ष्टि

WhatsApp Image 2021-10-18 at 22.46.49 (1).jpeg

श्री हिंगुलांबिका देवी मंदिर विश्वस्त मंडळ, परभणी ही एक नोंदणीकृत संस्था आहे. ज्याचा नोंदणी क्रमांक 5024-A (परभणी) असा असून भारत सरकारच्या आयकर कलम 1961अंतर्गत 12-A व 80-G प्राप्त संस्था आहे. या संस्थेस येणारी देणगी ही 50 टक्के सुट प्राप्त देणगी आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या तिर्थक्षेत्र-क अंतर्गत मंजूर संस्था आहे. तसेच संस्था नितीआयोगामार्फत नोंदणी कृत संस्था आहे. भविष्यकाळात शासनाचे अनुदान किंवा सीएसआर निधी निळविण्याकरीता संकेतस्थळाची आवश्यकता असल्यामुळे व कुठलीही माहिती तोंडी सांगण्यावेक्षा संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणे करीताही संकेतस्थहाची आवश्यकता होती. तसेच माहिती चिरकाळ साठविण्याकरीता संकेतस्थाळाची आवश्यकता भासत आहे. त्या करीता संस्थेची पूर्वइतिहास, सर्व प्रकारचे शासकीय नोंदणी, कार्यकारणीची माहिती, केलेल्या कामाची माहिती फोटो स्वरुपात वेब साईटवर देत आहोत. तसेच समाजातील शैक्षणिक व वैवाहिक माहितीही या वेबसाईटवर देण्याचा मानस आहे.   

     आपणास माहिती आहेच की, आपला भावसार समाज हा संपूर्ण भारत वर्षा मध्ये जरी असला तरी हया देशांतील प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, अत्यल्प तेलंगण,अंध्रप्रदेश,तामीलनाडू मध्येप्रदेश, गोवा व गुजारत या राज्यात व उर्वरित भारतभरात सर्वदूर विखुरला गेला आहे. त्या कारणाने एकमेंका सोबतचे संबंध हे छोटया छोटया वर्तुळात सिमित झाले जसे राज्य, विभाग, जिल्हा किंवा तालुका पूर्वी जेंव्हा इतकी प्रगत अशी दळणवळनाची साधने नव्हती. तेंव्हा तर तालुका हेच फार मोठे क्षेत्र वाटायचे व सर्व समाज बांधवांचे विवाह संबंध तेवढयाच मर्यादेत जुळायचे. पूर्वी वधु-वरा विषयीच्या अपेक्षाही अत्यंत माफक अशा होत्या. मुलगा स्वतःच्या पायावर उभा असावा व मुलगी रूपवान नसली तरी गृहकर्तव्यदक्ष असावी बस्स.

 

     परंतु नंतर काळ झपाटयाने बदलत गेला शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसाराने एक नवि क्रांती सर्वच क्षेत्रात आली. मुले, मुली अधिकाधिक शिकावयास लागली व त्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा, जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण व पर्यायाने जोडीदार विषयीच्या अपेक्षाही बदलत गेल्या. आता मात्र सिमीत क्षेत्रामध्ये त्यांना अनुरूप जोडीदार मिळणे / शोधने कठिण जावू लागले परंतु हयाच काळात दळण वळणच्या व संपर्काच्या सोयीसुविधाही झपाटयाने बदलल्या. त्यामुळे जग जवळ येवू लागले. गांवोगांवी रस्ते व वाहनांची सोय झाल्याने संपर्क साधता येवू लागला. अलिकडच्या कांही वर्षात कृत्रिम उपगृहांमार्फत संदेशवहन (Communication through satilite) होवु लागल्याने टेलिफोन सुविधा सहज उपलब्ध झाली व सद्या हया सर्वाचा परिपाक म्हणजे उपगृहामार्फतसंगणकाव्दारे उपलब्ध संकेतस्थळे (वेबसाईट्स) हि माहिती तंत्रज्ञानातील पुढचे पाउल ठरले आहे.

 

     अमेरिकेतील न्यूयॉर्क सारख्या एखादया शहरात राहणारा मुलगा परभणीच्या एखाद्या नगरात राहणा-या आपल्या आई वडिलांशी ईंटरनेटव्दारे सरळ संभाषण करू लागला. सायकलवरून उन्हातान्हात भटकणाऱ्या पोस्टमनची वाट पाहणे आता हळुहळु लोक विसरत चालले आहेत. ई-मेल व्दारे सरळ संदेश देणे घेणे सुरू झाले आहे आणि अशा अत्याधुनिक अशा सोयीचा म्हणजेच संकेतस्थळाचा फायदा आपण आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी करून घेण्याचा एक मानस व ध्येय डोळयासमोर ठेवूनच भावसार समाजाचे हे संकेतस्थळ - वेबसाईट नोंदवण्याचा प्रथम मान परभणी भावसार समाजाने पटकावला आहे असे अभिमानाने सांगावेसे वाटते.

 

     हयापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे हया वेबसाईटचा उपयोग भावसार समाजातील उपवर-वधूसाठी योग्य स्थळांची माहिती उपलब्ध करणे हा आहे व त्यास अधिक प्राथमिकता देणेही आवश्यक आहे. त्याच सोबत आपण ज्या समाजा मध्ये जन्म घेतला त्याचा इतिहास, आपली कुलदैवता माता श्री हिंगुलांबीका देवीची माहिती, देवीचे साजरे होणारे विवध उत्सव, समाजाची सद्दस्थिती या विषयीची माहिती घेणे, अजूनही कांही समाज बांधवाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे अशा गरिबपण हुशार मुलामुलींना विविध योजना / शिष्यवृत्ती किंवा बिनव्याजी / कमी व्याजाने आर्थिक मदत करुन त्यांचे व त्यांच्या कुटूंबाचे राहणीमान उंचावणे करिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या संदर्भात वेळोवेळी वेळोवेळी माहिती देवून, रितसर अर्ज मागविणे या वेबसाईटच्या माध्यमातून जलद व सोयीचे होवू शकते. हया करीता प्रथम महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांचा व त्यातील सर्व तालुक्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. परंतु असे करीत असतांना एक बाब लक्षात येते की, महाराष्ट्रातील या सिमेस -सिमा लागून असलेली ईतर भाषीक राज्य सुध्दा हयात समाविष्ट करावी लागतिल, कारण विदर्भाचा संबंध मध्यप्रदेशात, मराठवाडयाचा संबंध आंध्र व कर्नाटकात तर खानदेशाचा गुजरातेत असा ब-याच प्रमाणात जुळलेला आहे. त्यामुळे या शेजारील राज्यात उप-वधुवरांची माहिती गोळा करणे शक्य होणार आहे. तेंव्हा गांव, जिल्हा, विभाग, राज्य अशा सिमारेषा न पाहता सर्व समाजबांधवासाठी या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्याचे ठरविले आहे.

     दुसरे असे की, भावसार समाजाने पूर्वीचे रंगाई / शिलाई ई. व्यवसाया तून बाहेर पडून नविन नविन क्षेत्रामध्ये चांगली मजल मारली आहे. अनेक मोठे उद्योगपती, व्यापारी, वरिष्ठ सरकारी अधिकारी, सामाजिक पदाधिकारी डॉक्टर इंजिनिअर, शास्त्रज्ञ ई. क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. त्यमुळे अशा सर्व क्षेत्रातील समाज बांधवांची माहिती सर्वांना होणे आवश्यक आहे.

 

     एकूण समाजाचे शैक्षणिक / धार्मीक / राजकीय / सामाजिक चित्र सर्वांना नजरेसमोर यावे हाही या संकेतस्थळाच्या निर्मीती मागचा आणखी एक उद्येश आहे. भावसार समाज बांधवांनो आपण आता पर्यंत स्वतःसाठी व आपल्या कुंटूबासाठी जगलेलो आहोत परंतु आता वेळ आली आहे की, आपण आपले कुटूंब हया पलीकडील जगाकडे पाहण्याची. तेथे केवळ आई वडिल मुले मुली ईतकी नसून सर्व समाजबांधवांचे भावसारांचे एक व्यापक विश्व आहे. एक कुटूंब आहे. आपण त्या कुटूंबाचा एक घटक, एक सदस्य होण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपणास अधिक कांहीही करावयाचे नाही. केवळ आपला प्रत्येकाचा सक्रीय सहभाग हया कार्यात आवश्यक आहे व आपल्या नाविण्यपूर्ण कल्पना व सूचनांचे स्वागतच आहे.

ही एक सुरूवात आहे. आई श्री हिंगुलांबीकेच्या कृपेने व आपणा सर्व समाजबांधवांच्या सहकार्याने, प्रेरणेने हे कार्य वेग प्राप्त करिल यांत शंका नाही. सर्वांनी यात सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आहे.

जय हिंगलाज !!

संकलन

श्री उल्हास महादेवराव खंबायतकर

विश्वस्त तथा कार्याध्यक्ष

bottom of page