Reg.No - A5024 (Parbhani)
भावसार या शब्दाचे विश्लेशण भावसार हे दोन्ही शब्द संस्कृत शब्द असून भाव-भक्ती श्रध्दा तर सार-श्रेष्ठ असा अर्थ होतो. प्राचिन कालापासून हिंदू धर्मामध्ये ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य आणि शुद्र असे चार वर्ण अस्तीत्वात होते. या मध्ये क्षत्रिय वर्णाच्या अनेक शाखेत ‘भावसार‘ नावाची एक शाखा पुरातन कालापासून अस्तीत्वात आली.
श्री हिंगुलांबिका देवि विश्वस्त न्यासास देणगी देणे बाबत अवहान करण्यात येते की, या संस्थानमध्ये सद्यस्थितीत देविची उपासना तर होतेच परंतु त्याच बरोबर हे सामाजिक सभागृह होण्याकरीता महिला सशक्तीकरणा अंतर्गत शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्र चालू असून लवकरच या ठिकाणी संगणक प्रशिक्षण केंद्रही चालू करणार आहोत.
त्याच बरोबर या ठिकाणी लवकरच नेहमीसाठी 50 व्यक्तीकरीता प्रत्येक मंगळवार व शुक्रवार रोजी अन्नदान कार्यक्रम महाप्रसाद स्वरुपात राबविण्यात येणार आहे. या करीता येथे सभागृहाचे व खोल्याचे बांधकामा करीता तसेच वरिल सेवा ही नियमीत करण्याकरीता देणगीची आवश्यकता आहे. संस्थानच्या वतीने मातेची शास्वत पुजा/अभिषेक आपल्या जन्मदिनी अथवा लग्नदिनी वर्षातून एक वेळेस करण्यासाठी रु.1001/- (रु.एक हजार एक केवळ) भरुन नांव नोंदणी करावी हि विनंती. आपणा सर्व भाविक भक्ताना नम्र विनंती की आपण आमुल्य योगदान देऊन संस्थनला सहकार्य करावे हि नम्र प्रार्थना.
जय हिंगलाज